बदनापूर- जालना जिल्ह्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. लोकसभेसाठी अनेक बडे नेते इच्छूक असून सर्वांना आपणच जिंकणार असल्याचा ठाम विश्वास आहे. आमदार बच्चू कडू यांच्यासोबतच राज्यमंत्री अर्जुन खोतकर देखील दंड थोपटून दानवेंना पराभूत करण्याच्या तयारीला लागले आहेत. बदनापूर येथे झालेल्या मेळाव्यात अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना खोतकर म्हणाले कि, मित्र पक्षाने आपली वाट लावण्याचे कारस्थान सुरू केले आहे, याला मित्र म्हणावे का वैरी? राज्यात युतीचे सरकार आहे, पण शिवसेनेच्या काही मोजक्याच मंत्र्यांना सोडले तर इतर मंत्र्यांना फारसे अधिकार ठेवलेले नाहीत. तेव्हा आता भाजपशी युती नको, झालीच तर जालन्याची जागा सोडू नका, मैत्रीपूर्ण का होत नाही, पण एकदा होऊनच जाऊ द्या," असे आपण उध्दव ठाकरे यांना सांगितले असल्याचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
यांच्या विरोधात जालना लोकसभा निवडणूक लढवायचीच असा प्रनच शिवसेनेचे राज्यमंत्री व
दानवे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जून खोतकर यांनी घेतला आहे. बदनापूर येथे
झालेल्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा जालना लोकसभा लढवणारच असल्याचे ठामपणे
सांगतिले. रावसाहेब दानवे जिल्ह्यातील शिवसेना संपवायला निघाले आहेत असा आरोप खोतकर
यांनी यापुर्वी केला होता. आजच्या आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा भाजपवर थेट हल्ला
चढवला. मागच्या वेळी युतीमुळे आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी टेबल लावले होते, पण आता त्यांची वाट लावणार असा इशारा
देखील खोतकर यांनी यावेळी दिला.
लोकसभा लढवण्यासा उध्दव साहेबांनीच
सांगितले. अर्जून खोतकर हे जालना लोकसभा निवडणूक लढवणार पण शिवसेनेकडून नाही तर
काँग्रेसकडून असा प्रचार जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचा संदर्भ
देत या मेळाव्यात एका कार्यकर्त्याने थेट उभे राहून अर्जून खोतकर यांना याबाबत
सवाल केला. तेव्हा आपल्याला लोकसभा लढवण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच
सांगितले असल्याचा खुलासा खोतकर यांनी केला.